Pune Pimpri-chinchwad: गणेश वर्गणीसाठी तगादा लावला तर होणार कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा मंडळांना इशारा

0
14
Pune Pimpri-chinchwad: गणेश वर्गणीसाठी तगादा लावला तर होणार कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा मंडळांना इशारा


पुणे : पुण्यातील गणेशशोत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सोहळा साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा केली जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करत आहेत. दरम्यान, ही वर्गणी गोल करतांना अनेकदा जबरदस्ती केली जाते. तसेच मारहाण देखील केली जाते. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी मंडळांना इशारा दिला आहे. ‘वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती करू नका,’ असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यास गुन्हे दाखल केले जाईल असा, इशारा त्यांनी दिला आहे.



Source link