pune ola uber crisis : पुण्यात ओला उबेर बंद! जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांचा परवाना केला रद्द

0
22
pune ola uber crisis : पुण्यात ओला उबेर बंद! जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांचा परवाना केला रद्द


मोटार व्हेईकल अॅग्रिगेटर गाईडलाईन्स, २०२० च्या अधिनियमानुसार चारचाकी हलक्या वाहनांकरिता ॲॅग्रिगेटर लायसन्स मिळण्यासाठी ओला आणि उबेर यांचे अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे प्रलंबित होते. या कंपन्या कायद्यात असणाऱ्या तरतुदींची पूर्ण पूर्तता करीत नाहीत, असे पुनर्विलोकनात आढळून आले. त्यामुळे या दोन्ही अर्जदारांनी चारचाकी हलक्या वाहनांकरिता प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी प्राधिकरणाच्या सोमवारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, आरटीओने या संदर्भात परिपत्रक काढत याची माहिती दिली आहे.



Source link