
Pune Hadapsar news : पुण्यात हडपसर येथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित सुभाष मंडाळकर (वय १२, रा. महापालिका शाळेसमोर, डीपी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली.







