
Pune Murder: पुण्यातील ताम्हिणी घाटात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची गळा आवळून आणि चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. या अनुषंगाने चिंचवड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिटने तपास सुरू केला. अखेर याप्रकरणातील आरोपींचा पकडण्यात पोलिसांना यश आले. उसने पैसे परत मागितले म्हणून मृत व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली. रणजित सिंह (वय, ७०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.




