Pune murder : धक्कादायक! शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने केले वार मग कारने चिरडले

0
17
Pune murder : धक्कादायक! शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने केले वार मग कारने चिरडले


भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय ५५, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. तर पत्नी अनुसया वाल्हेकर या जखमी आहेत. संजय हिंदुराव पायगुडे (वय ५०, रा. मांडवी बुद्रुक) आणि सचिन नथु पायगुडे (वय ४५, रा. मांडवी बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी संजय पायगुडेला अटक करण्यात आली आहे. सचिन पायगुडे हा फरार झाला आहे. ही घटना बुधवारी (३ जुलै) रात्री ९.३० च्या सुमारास मांडवी बुद्रुक गावात घडली. या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.



Source link