
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष धोत्रे हा दादा घुले यांच्या घरी भाड्याने राहतो. हे दोघेही बांधकाम कामगार असून मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते दोघे दारु प्यायला बसले होते. दारू प्यायल्यानंतर आरोपी संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दरम्यान, दादा घुले यांनी मोटारसायकल सुरू करुन तिचा एक्सिलेटर वाढवला. गाडीचा मोठा आवाज झाल्याने आरोपी संतोष धोत्रे याची झोपमोड झाली. यामुळे राग आल्याने संतोष धोत्रे आणि दादा घुले यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण टोकाला केले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच हाणामारीतून संतोषने घुले यांना मारहाण करत पाण्याच्या टाकीत टाकले. या ठिकाणी दादा घुले यांना त्याने पाण्यात बुडून त्यांना ठार मारले.




