
Pune Lonavla megablock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान, इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिरा धावणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेऊन तसेच रेल्वेचे वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







