
दुबईहून सोन्याच्या तस्करीचे प्रकार वाढले
पुण्यात बुधवारी दुबईतून आलेल्या एसजी ५२ या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला खबऱ्या कडून मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी आणि तपासणी सुरू केली. त्यात एक व्यक्ति हा संशयास्पद वागत असल्याने तो बसलेल्या ठिकाणी तपासणी करत त्याची चौकशी केली. त्याच्या सामानात काही आढळले नाही. मात्र, सीट खाली तपासणी केली असता हे सोने आढळले.






