Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! आयुक्तांनी केले दोन पोलिसांचं निलंबन, एफसी रोडवरील बार सील

0
18
Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! आयुक्तांनी केले दोन पोलिसांचं निलंबन, एफसी रोडवरील बार सील


पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल व पबमध्ये तरुण-तरुणी मनोरंजनासाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचे या हॉटेलमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. यात या हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रक्ररण आणि ललीत पाटील ड्रग्स प्रकरण अजून शांत झाले नसतांना ही घटना उघडकीस आल्याने पुण्यतिल हॉटेल आणि पब धारकांना अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



Source link