
अरविंद देवकर असे या शिक्षकांचे नाव असून त्याची दोन महिन्यांपूर्वी बुवाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर बदली झाली होती. मात्र, येथील शाळा ही खराब असल्याने त्यांनी शाळेची दुरवस्था पाहून ती शाळा व्यवस्थित करण्याचे ठरवले. या साठी विद्यार्थ्यांना देखील त्यांनी सोबत घेण्याचे ठरवले. दरम्यान, छोट्याश्या शाळेची स्वच्छ करून घेण्यासाठी आणि स्वयंशिस्तीचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदानाचा हेतु मुलांना समजावा असा उदात्त हेतु ठेऊन त्यांनी ही कृती केली, मात्र, मुलांच्या पालकांना ही बाब पटली नाही. त्यांनी शाळेत येऊन दरेकर यांच्याशी वाद घालत गोंधळ घातला. त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या शाळेतून काढून टाकत दुसऱ्या शाळेत घातले. ही बाब अरविंद देवकर यांच्या मनाला लागली. चांगलं करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ते नैराश्यात गेले. त्यांनी विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत त्यांनी या बाबतचा खुलासा केला आहे.






