Pune Crime: प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला! सदाशिव पेठेच्या घटनेची पुनरावृत्ती टळली; महिलेमुळे वाचले प्राण

0
18
Pune Crime: प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला! सदाशिव पेठेच्या घटनेची पुनरावृत्ती टळली; महिलेमुळे वाचले प्राण

Pune Crime News : पुण्यात सदाशिव पेठेत एका तरुणीवर काही दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतांना या घटनेसारखी एक घटना सोमवारी शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात दुपारी घडली. एक तरुणी बोलत नसल्याच्या कारणामुळे दोघांनी तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिलेने प्रसंगावधान राखत, आरडा ओरडा केल्याने हल्लेखोर दोघे पळून गेले. मात्र, त्यांनी जातांना नगरिकांना कोयत्याचा धाक दाखवून तो रस्त्यात फेकून दिला.

Source link