
Pune gokhle nagar Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. खून, दरोडे, लुटपाटीबरोबर आता नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना देखील उघडकीस येत आहे. पुण्यात गोखले नगर येथे आई घर नावावर करून देत नसल्याने पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात खुर्ची मारून तिला गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलासह त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



