
पुणे : पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. पुणे पोलिस गुरुवारी कोम्बिंग ऑपेरेशन करत असताना एटीएम लुटल्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीवर कारवाईच्या दरम्यान, दरोडे खोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलिस कर्मचारी हा जखमी झाला आहे. पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला. या थरारावेळी एका आरोपीने धारदार शस्त्र फेकून मारले. ही घटना वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ घडली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.







