Pune Accident : अपघात झाल्यावर विशाल अगरवालने आमदार सुनील टिंगरेंना केले ४५ मिस्डकॉल्स, फोन रेकॉर्डवरून माहिती उघड

0
99
Pune Accident : अपघात झाल्यावर विशाल अगरवालने आमदार सुनील टिंगरेंना केले ४५ मिस्डकॉल्स, फोन रेकॉर्डवरून माहिती उघड


Pune Porsched Car Accident Update : पुण्यात कल्याणी नगर येथे बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्यावर मुलाला वाचवण्यासाठी विशाल अगरवाल याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना रात्री २.३० च्या सुमारास तब्बल ४५ वेळा कॉल केले. मात्र सुनील टिंगरे हे झोपले असल्याने त्यांनी फोन उचलला नाही. अखेर जाग आल्याने विशाल अगरवालयाचा ४६ वा फोन टिंगरे यांनी उचलला. यानंतर पहाटे ४ च्या सुमारास टिंगरे हे पोलिस ठाण्यात पोहोचले. टिंगरे हे येरवडा पोलिस ठाण्याच्या सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान, या वरून आमदार सुनील टिंगरे हे अडचणीत आले होते. त्यांनी या बाबत नंतर खुलासा देखील केला होता.



Source link