
गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६), विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघेही रा. एल अँड टी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी अपघातात ठार झालेल्यांची नवे आहेत. हेमंत लखमन दलाई (वय ३०, रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांचावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाता प्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी, ता. बारामती) याला अटक करण्यात आली असून बेदरकारपणे आणि वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली, मूळ रा. कौठाळा, जि. लातूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.





