फलटणमध्ये पालखी स्वागतासाठी तयारी पूर्ण; रस्त्यांची दुरुस्ती करून शहर सज्ज?

0
127
फलटणमध्ये पालखी स्वागतासाठी तयारी पूर्ण; रस्त्यांची दुरुस्ती करून शहर सज्ज?

फलटण, दि. २२ जून २०२५ – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन २८ जून रोजी फलटण शहरात होणार असून, त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, या दुरुस्तीमुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे.

फलटण नगरपरिषदेच्या पाठपुराव्यामुळे नॅशनल हायवे प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कामे वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. रिंग रोड, मुधोजी हायस्कूल रस्ता, तहसील कार्यालय रस्ता यांसह संपूर्ण पालखी मार्गाचा यात समावेश आहे, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.

रस्त्यांची ही सुधारणा केवळ वारकऱ्यांसाठीच नव्हे, तर शहरातील नागरिकांसाठीही दिलासादायक ठरणार आहे. सोहळ्याच्या अनुषंगाने शहरात स्वागत मंडप, विद्युत रोषणाई आणि स्वच्छतेची विशेष तयारी करण्यात आली आहे.