
दुसरीकडे सागरची आई इंद्रा सईला आणयला सावनीच्या घरी आलेली असते. ती सावनीच्या पाया पडते की माझ्या नातीला सोड.. सावनी मात्र त्यांना घराबाहेर काढते. मुक्ता तिथेच घरात बसलेली असते. मुक्ताला समोर पाहून सागर चिडतो. पण मुक्ता जेव्हा येते तेव्हा सावनी आणि हर्षवर्धन हे सईला हॉस्टेलला टाकण्याविषयी बोलताना दिसतात. ते ऐकून मुक्ताला धक्का बसणार आहे. आता सईची कस्टडी कोणाला भेटणार? मुक्ता सईला समजावणार का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.







