
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आशयची एण्ट्री झाल्यापासून कथानकाला एक वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि आशय हे चांगले मित्र असू शकतात यावर सागरचा विश्वास नाही. तो सतत मुक्तावर अविश्वास दाखवत आहे. या सगळ्या गोष्टींचा सावनी फायदा उचलते. ती सागरला आणखी भडकवून देते. तसेच सागर सतत सावनीच्या प्लानला बळी पडताना दिसत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







