
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या मालिकेतील मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. एक अगळीवेगळी प्रेम कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. आता सागर आणि मुक्ता विवाहबंधानत अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा आणि मेहंदी सोहळा पार पडला असून लवकरच संगीत आणि विवाहसोहळा होणार आहे. त्यापूर्वी संगीत सोहळ्यात सागरचे आई-वडील डान्स करणार असल्यामुळे मुक्ता-सागरमध्ये वाद होणार आहे.






