Premachi Goshta: इंद्राने पहिल्यांदाच देणार मुक्ताला पाठिंबा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

0
16
Premachi Goshta: इंद्राने पहिल्यांदाच देणार मुक्ताला पाठिंबा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?


सावनीने केले मुक्तावर आरोप

हर्षवर्धनने लग्नाला नकार दिल्यामुळे सावनी चिडते. ती मुक्ताला सतत तिने हे मुद्दाम केल्याचे बोलते. तसेच तुझी बहिण मिहिकाला तर मी सोडणार नाही असे ती बोलते. मुक्ताला हे सगळं पाहून धक्का बसतो. तिच्या तोंडातून एक अक्षरही निघत नाही. सावनी मुक्तावर हात उगारते. तेवढ्यात सागर पुढे येतो आणि सावनीला थांबवतो. तो तिला स्पष्ट शब्दात बजावतो, ‘मुक्ता माझी बायको आहे. ती कधीही खोटं बोलत नाही. तिच्यावर हात उचलण्यापूर्वी विचार कर.’ ते ऐकून सावनी आणखी चिडते. ती सागरला म्हणते, ‘आज तुला माझी किव यायला हवी होती. पण नाही नेहमी तू तुझ्या बायकोची बाजू घेतोस. तिला देखील हे सगळं भोगावं लागेल.’



Source link