
स्टार प्रवाहकडून कलाकारांसोबतच तंत्रज्ञ मंडळींचाही विशेष सन्मान करण्यात येतो. दिग्दर्शक आणि लेखकांना सन्मानित केल्यानंतर यंदा मालिकांच्या २० छायाचित्रकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे, मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.