
अभिनेता प्रसाद ओक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या पत्नीने अर्थात मंजिरी ओक हिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने प्रसादसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंजिरीने तोंडावर मास्क लावला आहे. तर, प्रसाद ओक याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोसोबत कॅप्शन लिहिताना मंजिरीने लिहिलं की, ‘प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन, गप्प बसेन, तुला बोलू देईन, मी फक्त ऐकेन. तर जागा हो. फोटो आहे तो, मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते… तुला पर्याय नाही… ओह सॉरी सॉरी आज चांगलं बोलायचं असतं ना? ओके ओके, आय लव्ह यु. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!’








