Prakash Ambedkar on modi : नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं थेट आव्हान

0
18
Prakash Ambedkar on modi : नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं थेट आव्हान


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील ज्या मतदारसंघात वंचितची ताकद आहे, अशा मतदारसंघाची माहिती महाविकास आघाडीकडे दिली आहे. महाआघाडीचे जागावाटप करताना १५ जागा ओबीसीसाठी आणि ३ अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवण्याची आमची मागणी आहे. मात्र माध्यमांमध्ये या आमच्या अटी असल्याचं दाखवण्यात येत आहे. आम्ही त्यांच्याकडे आमचं म्हणणं मांडलंय, त्यांनी निर्णय घ्यावा. कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं वाढू नये,  डोकेदुखी  वाढू नये म्हणून मविआच्या बैठकीला जावू नका असे म्हटलं होतं. मात्र १५ जागांवरचा तिढा सुटला तर पुढे निर्णय घेतला जाईल. 



Source link