Porsche Accident:बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी मृतांच्या व्हीसेऱ्यात दारूचे अंश; पोर्शे अपघातप्रकरणी अनिल देशमुखांचा आरोप

0
23
Porsche Accident:बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी मृतांच्या व्हीसेऱ्यात दारूचे अंश; पोर्शे अपघातप्रकरणी अनिल देशमुखांचा आरोप

यात त्यांनी म्हटले आहे की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन मृत तरुण-तरुणी हे दारु पिऊन बाइक चालवत होते व त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. यामुळे विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, असे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे.

Source link