
पूजा भट्ट वैद्यकीय कारणांमुळे बाहेर जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, ती आता जरी या शोमधून बाहेर पडत असली तरी, वैद्यकीय चाचणीनंतर घरात परतणार असल्याचीही चर्चा आहे. आता पूजाची खरोखरच शोमध्ये री-एंट्री होते की, या शोमधून ती कायमची बाहेर पडते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, पूजा भट्ट या घरातून बाहेर गेल्याच्या वृत्ताची निर्मात्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.







