
भारतीय जनता पक्षाने तामिळनाडू राज्यात ‘तामिळ मनिला काँग्रेस’सोबत (TMC) हात मिळवला आहे. राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये सोबत राहणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आघाडीनंतर प्रदेश भाजपने वासन यांच्या राजकीय कार्याचे भरभरून कौतुक केले.
चेन्नई : भारतीय जनता पक्षाने तामिळनाडू राज्यात ‘तामिळ मनिला काँग्रेस’सोबत (TMC) हात मिळवला आहे. राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये सोबत राहणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आघाडीनंतर प्रदेश भाजपने वासन यांच्या राजकीय कार्याचे भरभरून कौतुक केले.
भाजपने तामिळनाडू राज्यात द्रमुक तसेच अण्णा द्रमुकशिवाय अन्य पक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यात आज यश आले असून, जी. के. वासन यांच्या नेतृत्वातील तामिळ मनिला काँग्रेससोबत (टीएमसी) हातमिळवणी केली. यानंतर टीएमसीने राज्यातील अन्य पक्ष सुद्धा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली. आपले वडील तसेच नेता मुपनार यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्तरावर राहिलेला आहे.