Political News | भाजपने आयारामांना दिली लोकसभेची संधी; 116 आयात नेत्यांना तिकीट, तर निष्ठावंतांना… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Political News | भाजपने आयारामांना दिली लोकसभेची संधी; 116 आयात नेत्यांना तिकीट, तर निष्ठावंतांना… | Navarashtra (नवराष्ट्र)


भाजपने आयारामांना दिली लोकसभेची संधी; 116 आयात नेत्यांना तिकीट, तर निष्ठावंतांना…

लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आतापर्यंत 400 हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. चारशे पार जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पक्षाने 116 आयात नेत्यांना तिकीट दिलेले आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आतापर्यंत 400 हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. चारशे पार जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पक्षाने 116 आयात नेत्यांना तिकीट दिलेले आहेत. भाजपचे तब्बल 28 टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षांतून आलेले आहेत. आतापर्यंत भाजपाने 417 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी एकूण 116 उमेदवार दुसऱ्या पक्षांतून भाजपामध्ये दाखल झालेले आहेत.

देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. तेथे आतापर्यंत 64 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यातील 20 जागांवर निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ या राज्यातच नाही तर तामिळनाडूत 11, पश्चिम बंगाल व ओडिशात प्रत्येकी आठ व महाराष्ट्रात सात आयाराम-गयारामांना-भाजपने तिकीट दिले आहे.






Source link