Political News | मध्य प्रदेशात काँग्रेसला पुन्हा धक्का; प्रदेश प्रवक्ते सय्यद जाफर यांच्यासह 65 नेते भाजपमध्ये | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Political News | मध्य प्रदेशात काँग्रेसला पुन्हा धक्का; प्रदेश प्रवक्ते सय्यद जाफर यांच्यासह 65 नेते भाजपमध्ये | Navarashtra (नवराष्ट्र)


मध्य प्रदेशात काँग्रेसला पुन्हा धक्का; प्रदेश प्रवक्ते सय्यद जाफर यांच्यासह 65 नेते भाजपमध्ये

मध्य प्रदेशात एकापाठोपाठ एक काँग्रेस नेते पक्ष सोडत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय, काँग्रेस प्रवक्ते सय्यद जाफर (Syed Zafar) यांच्यासह छिंदवाड्यातील 65 नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

भोपाळ : मध्य प्रदेशात एकापाठोपाठ एक काँग्रेस नेते पक्ष सोडत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय, काँग्रेस प्रवक्ते सय्यद जाफर (Syed Zafar) यांच्यासह छिंदवाड्यातील 65 नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र नईमा, अलोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश डागी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश मैनुखेडी, ब्लॉक अध्यक्ष दुर्गालाल अटोलिया, एनएसयूआयचे जिल्हा प्रभारी गोपाल सिसोदिया यांच्यासह 65 जणांचा समावेश आहे. भाजपची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले, असे यावेळी त्यांनी सांगितले.






Source link