Police Bharti : खुशखबर..! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

0
22
Police Bharti : खुशखबर..! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज


मृहमंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्या म्हटले आहे की, पोलीस भरती २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की, दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५.०४.२०२४ करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.



Source link