PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

0
17
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी


PM modi pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार आहे. या सोबतच त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी  १ ऑगस्ट रोजी पुणे शहराच्या मध्यभागातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. असा आदेश प्रशासनाने जारी केला आहे. शहरातील डेक्कन एज्युकेशन, शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारीही दुपारच्या सत्रातील वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे.



Source link