
PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत वाढवून 8 हजार रुपये केली जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या मोठ्या योजनांमध्ये पंतप्रधान किसाम सन्माम निधी योजनेचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. या योजनेंअंतर्गत शेतकरी बांधवांच्य खात्यावर पैसे पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जाता. हे पैसे तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मिळतात . याच योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजस्थानच्या भाजप सरकारने राजस्थानच्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.










