
कॅनडामध्ये विमान कोसळून (Plan Crashed in Canada) दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत.
ओटावा : कॅनडामध्ये विमान कोसळून (Plan Crashed in Canada) दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत.
ब्रिटिश कोलंबिया प्रांतात येणाऱ्या व्हँकूअरपासून 100 किमीवर विमानाला अपघात झाला. अपघातग्रस्त विमान आकाराने लहान आहे. विमानतळाजवळ असलेल्या मॉटेलच्या (हायवेवरील हॉटेल) परिसरात हा अपघात झाला. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. अपघाताची माहिती दोघांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.








