
फलटण (जि. सातारा) – फलटण शहराच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात महत्त्वाचा ठरणारा निर्णय आज फलटण नगरपरिषद च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगरपरिषद मालकीच्या सभागृह आणि इमारतींना महापुरुषांची नावे देण्याबाबतचा ठराव क्र. 9 बहुमताने मंजूर करण्यात आला.
या ठरावावर विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवून विरोध दर्शविला. मात्र, सत्ताधारी गटाच्या पाठिंब्यामुळे हा ठराव मंजूर झाला.
या निर्णयानंतर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भीमअनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्र येत आतिषबाजी करून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. या निर्णयाला सामाजिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक महत्त्व असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या ठरावासाठी मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांच्यासह सर्व संबंधितांचे आभार मानण्यात आले.
या वेळी सुपर्णा ताई अहिवळे, सचिन सर अहिवळे, मीनाताई काकडे, कामगार संघटनेचे सनी घ. काकडे, RPI चे विजय येवले, संजय निकाळजे, संजय गायकवाड, सागर दादा सोरटे, प्रशांत आप्पा काकडे, हरीष काकडे, सनी मोरे, सुनील नाना अहिवळे, विकी बोके, जीवन काकडे, वैभव मोहिते, किरण सर अहिवळे, पिंटू संभाजी मोरे, अभिजित गायकवाड, मुकेश रणपिसे, प्रकाश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणांना महापुरुषांची ओळख मिळणार असून, सामाजिक जागरूकतेला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








