फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडले: फलटणला आठवडाभरात दुसरी कारवाई

0
12
फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडले: फलटणला आठवडाभरात दुसरी कारवाई

फलटण: फलटण तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इब्राहिम मोहम्मदशफी मुलाणी (वय ४९, रा. हिरवे बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. खेड,जिल्हा पुणे) यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सात हजार रूपयांची लाचेची रकम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आरोपी मुलाणी याने कोरेगाव (ता. फलटण) येथील तक्रारदारास मोजणी हद्द कायम करण्याकरीता दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

फलटण तालुयातील लाचलुचपत विभागाची आठवडाभरात ही दुसरी कारवाई असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो.ह. नितीन गोगावले, पो.ह. निलेश राजपुरे, पो.शि. विक्रम कणसे यांनी केली.

लाच मागणी संबंधी तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं. ५२४/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार, सातारा येथे अथवा ९५९४५३११००, ९७६३४०६५०० कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२३८१३९ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ या क्रंमाकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी केली आहे.