फलटण शहर पोलिसांकडून मोबाईल फोन चोरणाऱ्या टोळीस अटक

0
17
फलटण शहर पोलिसांकडून मोबाईल फोन चोरणाऱ्या टोळीस अटक

फलटण : फलटण शहरात मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडत असून होणार तक्रारींची नोंद घेऊन फलटण शहर पोलीसांनी मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील तीन जनांना अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण ३लाख २ हजार ५०० रुपये किमंतीच्या मुद्देमाला हस्तगत केला आहे . यामध्ये १२ मोबाईल फोन व एका दुचाकीच्या समावेश आहे .

फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २१ / ३/ २०२४ रोजी डेक्कन चौक फलटण येथे युसुफ मन्सुर महात (वय ५२ वर्षे रा . कोळकी फलटण ) हे चालत जात असताना तीन अनोळखी आरोपींनी दुचाकीवर येऊन त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांच्या तपास सपोनि नितीन शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे

उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि. नितीन शिंदे आणि त्यांच्या पथकास मोबाईल फोन चोरीच्या घटनांबाबत आढावा घेऊन, चोरांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. माहितीच्या आधारे फलटण शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण कार्यवाहीमध्ये संशयीत आरोप निलेश अनिल जाधव (वय २१ वर्षे) निखील तुकाराम गदाई (वय १९ वर्षे) व मंगेश संजय गंगावणे (वय २१ वर्षे) तिघे रा. सोमवार पेठ, फलटण यांना अटक करण्यात आली. या संशयीत आरोपींना दि.२२/३/२०२४ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता दि.२४/३/२०२४ रोजी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सदर आरोपींकडून अंदाजे एकुण ३ लाख २ हजार ५०० रूपये किंमतीचे चोरलेले १२ मोबाईल फोन आणि चोरांच्या टोळीने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नितीन शिंदे, स.पो.फी. संतोष कदम, पो.ह चद्रकांत धापते, सचिन जगताप, पोशि. सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे यांनी केली.