फलटणमध्ये जनता दरबार: प्रलंबित कामांच्या निवाड्यासाठी नागरिकांना सुवर्णसंधी

0
1
फलटणमध्ये जनता दरबार: प्रलंबित कामांच्या निवाड्यासाठी नागरिकांना सुवर्णसंधी

फलटण – फलटण तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या शासकीय व वैयक्तिक प्रलंबित कामांसाठी सुनावणी व निवाडा मिळवण्यासाठी अनोखा प्रसंग निर्माण होणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १० जानेवारी २०२५ रोजी फलटणमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या जनता दरबारात फलटण तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यावर भर दिला जाणार आहे.

लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जनता दरबारात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रलंबित सार्वजनिक व वैयक्तिक कामांचे अर्ज तपशीलासह दोन प्रतींमध्ये दि. ६ जानेवारी २०२५ पूर्वी आमदार सचिन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय, महाराजा मंगल कार्यालयाजवळ, लक्ष्मीनगर, फलटण येथे सादर करावेत. अर्जावरच सुनावणी व निर्णय घेण्यात येणार असल्याने ऐनवेळी आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यावी.

विभागवार वेळेचे नियोजन

दरबारात विभागवार स्वतंत्र वेळ दिला जाणार असून, यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांचे सोपे आणि कार्यक्षम निवारण होईल.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा उपक्रम नागरिकांसाठी शासकीय यंत्रणेशी थेट संवाद साधण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे.