
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून पेट्रोल-डिझेल दर कपातीची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, पेट्रोल- डिझेल दर २ रुपयांनी स्वस्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या हिताचे रक्षण केले आहे. गेल्या काही वर्षात इंधनाच्या दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारवर टीका होत होती. यावरून यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत पेट्रोल डिझेलच्या दरात थेट २ रुपयांची कपात केली आहे.








