
बारामतीही महाविकास आघाडीच जिंकणार!
महायुतीचं वातावरण राज्यात कुठंच नाही, ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे परंतु जनभावना वेगळी आहे. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजप व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले, असा दावाही पटोले यांनी केला.






