
जानेवारी महिन्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांना ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियनच्या वतीने ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान आयोजित केला होता. एखाद्या भारतीयाला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या वर्गात टॉपरही होते.