Pankaja Munde : कोणताही समाज वेदना सहन करणार नाही; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निशाणा कुणावर?

0
20
Pankaja Munde : कोणताही समाज वेदना सहन करणार नाही; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निशाणा कुणावर?


सावरगावातील दसरा मेळाव्यात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर झालेले आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि उस तोड कामगारांना न्याय मिळत नाही. अशातच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. अपेक्षाभंग झाला की कोणताही समाज फार काळ वेदना सहन करू शकत नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. याशिवाय राज्यातील ओबीसी समाज देखील सरकारकडे आशेने पाहत असल्याचं सांगत शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा दिला आहे.



Source link