
Pandharpur Kasegaon Poshan Aahar News: अकोला, सांगली, नंदुरबारनंतर पंढरपूरमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मृत बेडूक आढळल्याने संताप व्यक्त केला. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अंगणवाडीतील आहार खायचा की नाही, असाही प्रश्न त्यांना पडला आहे.







