
नुकत्याच झालेल्या ‘झी सिने अवॉर्ड्स २०२३’मध्येही ‘द काश्मीर फाईल्स’चा जलवा पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार मिळवला आहे. पुरस्कार मिळाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताना, विवेक अग्निहोत्री यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विवेक अग्निहोत्री यांनी हे पुरस्कार शहीद संजय शर्मा यांना समर्पित केले आहेत.