
Palghar Gangrape News: पालघरमध्ये पालघरमध्ये गणेश उत्सवातून घरी परतणाऱ्या १० वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला काही आमिष दाखवून २ सप्टेंबर रोजी पहाटे नाला सोपारा येथील निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.