
Operation Sindoor India Airstrike Live Updates 8th may : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC जवळ विनाकारण गोळीबार, भारताने दिलं उत्तर
<strong>8- मरकज सुहानल्लाह, बहावलपूर<br /></strong> मरकज सुहानल्लाह हे जैशचे बहावलपूरमधील मुख्यालय होते, जे दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि भरतीचे केंद्र होते. मोठे दहशतवादी येथे येत-जात असत. (छायाचित्र: पीटीआय) <strong><a href=”https://www.jansatta.com/photos/picture-gallery/operation-sindoor-india-pakistan-first-photos-of-air-strike/3953104/" target=”_blank” rel=”noreferrer noopener”>पाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी हवाई हल्ला झाला त्या ठिकाणाची परिस्थिती काय आहे? दहशतवादी तळाच्या विध्वंसाचे हे भयानक दृश्य चित्रांमध्ये पहा</a></strong>
भारताने ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.





