pahalgam terror attack Pakistani leaving india crossed attari border live updates

0
17
pahalgam terror attack Pakistani leaving india crossed attari border live updates


Pakistani People Leaving India Live Update: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारत सरकारनं या हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर भारतातून पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याचं दिसून आलं. दुसरीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी हालचाली वाढल्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Live Updates

India Pakistan Latest News Update : भारत व पाकिस्तान खरंच युद्धाच्या उंबरठ्यावर? दोन्ही देशांत नेमकं घडतंय काय?

08:10 (IST) 28 Apr 2025

Pakistan Fire Small Arms Across LOC: एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

रविवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून एलओसी अर्थात प्रत्यक्ष सीमारेषेवर कोणतीही सूचना न देता दारूगोळा फेकण्यात आला. कुपवाडा आणि पूँछ भागातील सीमेवर हा प्रकार घडला. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

http://twitter.com/ANI/status/1916668381098635623

07:59 (IST) 28 Apr 2025

Indians Back from Pakistan: ८५० भारतीय परतले!

दरम्यान, एकीकडे ५३७ पाकिस्तानी भारतातून परत गेले असताना दुसरीकडे ८५० भारतीय मायदेशी परतले आहेत. यात पाकिस्तानातील भारतीय दूतावासातल्या १४ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

07:58 (IST) 28 Apr 2025

Pakistani People Leaving India: १२ श्रेणींमधील व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिक मायदेशी

२४ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत भारतातून अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये परतलेल्या ५३७ नागरिकांमध्ये १२ श्रेणींमधील अल्पकाळ व्हिसाधारकांचा समावेश आहे.

07:55 (IST) 28 Apr 2025

Pakistani Leaving India: पाकिस्तानी नागरिकांनी गाठली अटारी बॉर्डर!

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं दिलेल्या निर्देशांनुसार भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी थेट अटारी सीमा गाठली आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ५३७ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची आकडेवारी समोर आली आहे.

 

India Pakistan Latest News Update : पाकिस्तानविरोधात भारताची आक्रमक भूमिका, पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी





Source link