
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ३४ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी ३४ व्यक्तींना पद्म श्री पुस्कार देण्याची घोषणा झाली आहे. यात पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू,सर्वेश्वर, सांगथाम सहित अनेक इतर मान्यवर व्यक्तीच्या नावांचा सामावेश आहे. महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना (Uday Deshpande) पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.








