
मैं अटल हूं
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट ओटीटीवर देखील रिलीज होणार आहे. ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे याची माहिती दिली आहे. पंकज त्रिपाठीचा हा चित्रपट १४ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, पीयूष मिश्रा, रमेश कुमार सेवक, दया शंकर पांडे, प्रमोद पाठक, पायल नायर, राजेश खत्री यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत.








