
वीराना
‘वीराना’ हा चित्रपट बॉलिवूडचा एक कल्ट हॉरर चित्रपट मानला जातो. १९८८मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. भयपट आवडणाऱ्या चित्रपट प्रेमींना हा चित्रपट पुन्हा पहायला नक्कीच आवडेल. या चित्रपटात जास्मिन, साहिल चड्ढा, कुलभूषण खरबंदा, गुलशन ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट आजही युट्यूबवर पाहू शकता.








