
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे. भारताच्या हल्ल्यात युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तिन्ही सशस्त्र दलांची आज पत्रकार परिषद पार पडली असून, यावेळी सॅटेलाईट फोटो दाखवत पुरावे सादर करण्यात आले. या फोटोंमधून भारताने केलेली कारवाई आणि पाकिस्तानचं झालेलं नुकसान याचे पुरावे मिळाले आहेत.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं की, “सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या छावण्या आणि प्रशिक्षण स्थळांची ओळख पटवण्यात आली होती. तिथे अशी अनेक ठिकाणं असल्याचं आमच्या लक्षात आलं. यामधील अनके ठिकाणं आता रिकाम झाली होती. हल्ल्याच्या भीतीने ती आधीच रिकामी करण्यात आली होती. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं, ज्यामधून नागरी वस्ती वगळण्यात आल्या होत्या. गुप्तचर यंत्रणांनी 9 दहशतवादी स्थळांची ओळख पटवली होती. त्यापैकी काही पीओजेकेमध्ये होते, तर काही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात होते. लष्कर-ए-तैयबाचे केंद्र असलेल्या मुरीदकेसारख्या ठिकाणांनी गेल्या काही वर्षांत अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारखे दहशतवादी जन्माला घातले आहेत.”
#WATCH | Delhi: DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, “It set into motion a very diligent and microscopic scarring of the terror landscape across the borders and the identification of terror camps and training sites. The locations that emerged were numerous, but as we… pic.twitter.com/46s0Arka6g
— ANI (@ANI) May 11, 2025
पुढे त्यांनी सांगितलं की, “9 दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात आयसी 814 च्या अपहरणात आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी असलेले युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे दहशतवादीही मारले गेले. त्यानंतर लगेचच पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलं आणि नागरी वस्ती असलेल्या गावांवर आणि गुरुद्वारांसारख्या धार्मिक स्थळांवर हल्ला केला. ज्यामुळे दुर्दैवाने जीवितहानी झाली. भारतीय हवाई दलाने यापैकी काही छावण्यांवर हल्ला करून या हल्ल्यांमध्ये मोठी भूमिका बजावली. भारतीय नौदलाने शस्त्रसाठ्यासंदर्भात अचूक माहिती दिली”.







