‘Operation Sindoor फक्त ट्रेलर…’; राजनाथ सिंह यांचा पुन्हा पाकिस्तानला कडक इशारा, ‘वेळ आल्यावर संपूर्ण जगाला..’

0
7
‘Operation Sindoor फक्त ट्रेलर…’; राजनाथ सिंह यांचा पुन्हा पाकिस्तानला कडक इशारा, ‘वेळ आल्यावर संपूर्ण जगाला..’


Rajnath Singh on Operation Sindoor : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी भारत-पाकिस्तान सीमेजवळील भूज एअरबेसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एका कडक शब्दात इशारा दिला.  भूजमध्ये त्यांनी उपस्थित असलेल्या हवाई योद्ध्यांशी संवाद साधला. भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानीमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर योग्य उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, ‘हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर अजून येणे बाकी आहे’.

भुज हे शौर्य आणि विजयाचे प्रतीक!

राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात भूजच्या शौर्यगाथेची आठवण करून दिली आणि म्हणाले, “1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे हे भूज साक्षीदार राहिले आहे. 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे हे भूज साक्षीदार राहिले आहे. आणि आज पुन्हा एकदा, हे भूज पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे साक्षीदार बनले आहे.”

त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि पहलगाममध्ये अलीकडेच मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांनाही श्रद्धांजली वाहिली.

23 मिनिटांत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त!

राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी भूमीवर वाढणारे दहशतवादी तळ अवघ्या 23 मिनिटांत उद्ध्वस्त केले. “लोकांना त्यांचा नाश्ता पूर्ण करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितका वेळ तुम्ही शत्रूंशी सामना केला आहे.” ते म्हणाले की, हा केवळ क्षेपणास्त्रांचा प्रतिध्वनी नव्हता, तर तो भारताच्या पराक्रमाचा आणि हवाई दलाच्या शौर्याचा प्रतिध्वनी होता.

भारतीय हवाई दल ‘स्काय फोर्स’ बनले!

भारतीय हवाई दलाचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आता ते फक्त हवाई दल राहिलेले नाही तर ते एक स्काय फोर्स बनले आहे. ते म्हणाले की, भारताची लढाऊ विमाने आता सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूच्या प्रत्येक कोपऱ्याला लक्ष्य करू शकतात. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आता भारत परदेशी शस्त्रांवर अवलंबून नाही. डीआरडीओने विकसित केलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आणि ‘आकाश’ हवाई संरक्षण प्रणालीने हे सिद्ध केले आहे की ‘मेक इन इंडिया’ आता भारताच्या लष्करी शक्तीचा कणा बनला आहे.





Source link